आम्ही कुणाला घाबरत नाही, जे बोलायचं ते छातीठोकपणे बोलतो- चंद्रकांत पाटील
पुणे | अमित शहा यांच्या पायगुणाने महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचं सरकार जाईल अशी स्वप्ने पाहणाऱ्यांविषयी काय बोलावं?, असा सवाल शिवसेनेने सामनातून उपस्थित केला होता. याला भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अमित शहा खरं बोलले ते फार झोंबलं त्यामुळे ज्याला ज्याला जसं जमलं ज्यांनी माईल्ड प्रतिक्रिया काढली, त्यांना दम दिला गेला. दुसऱ्या दिवशी त्याच माणसाने पुन्हा स्ट्रॉंग प्रतिक्रिया द्यायची, त्यामुळे अमित शहा शिवसेनेबद्दल जे बोलले ते खरं होतं, त्यामुळेच ते झोंबलं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
भाजप हा पक्ष असा आहे कुणाला घाबरत नाही. आम्ही कुणाला घाबरत नाही, जे बोलायचं ते छातीठोकपणे बोलतो. समोरच्याला टाकून बोलणं, लागून बोलणं अशी आमची संस्कृती नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
अमितभाईंच्या पायगुणाने वैभववाडीतील 6 नगरसेवक गेले त्याचा काही संबंध नाही. अमितभाईंच्या पायगुणाने महाराष्ट्रात सरकार यायचं असेल तर येईल. मी काही भविष्यकार नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
“नरेंद्र मोदींनी नटसम्राट व्हावं, लोकतंत्रात असा ड्रामा चालत नाही
अवैधरित्या दारु विकण्यासाठी घेतला देवाचा आधार; घडलेला प्रकार पाहून पोलिसही हैराण
धक्कादायक! हॅार्न वाजवल्याचा राग आल्याने चालकाच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली
कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पवार कधी कुस्ती खेळलेत का?; सदाभाऊ खोतांना राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर
मोहम्मद सिराजने धरला कुलदीपचा गळा, व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ; पाहा व्हिडीओ
Comments are closed.