बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेत आले, तरी…- चंद्रकांत पाटील

मुंबई | राज्यात महिला आत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढताना आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आले, तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अत्याचारग्रस्त महिलांचा टाहो ऐकायला जात नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

मेळघाटामध्ये एका महिला वनाधिकाऱ्याचा मृत्यू झाला. त्याला कोण जबाबदार आहे? महाविकास आघाडीचे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. संवेदना नसलेल्या या भ्रष्ट सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकार निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांनी उरण, खारघर आणि पनवेलमध्ये शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठका घेतल्या. यावेळी ते बोलत होते.

कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. मात्र पण हे सरकार बेभान होऊन केवळ आपले गुन्हे आणि भ्रष्टाचार लपविण्यामागे व्यस्त आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे जरा डोळे उघडून हा आलेख बघा म्हणजे तुम्हाला राज्यावर येणाऱ्या मोठ्या संकटाची जाणीव होईल, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

ठाकरे सरकारचं भीषण स्वरूप भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवलं पाहिजे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“लोक सांगूनही ऐकत नाहीत, मग लॉकडाऊन हाच पर्याय”

पुण्यातील फॅशन स्ट्रीटला लागलेल्या भीषण आगीत 800 दुकानं जळून खाक!

बेअरस्टो, स्टोक्सनं आपल्या दमदार खेळीनं पळवला भारतीय संघाच्या तोंडचा विजयाचा घास

धक्कादायक! बापानेच केलं पोटच्या मुलीसोबत काळीमा फासणारं कृत्य, वाचून तूम्हीही व्हाल सुन्न

नाईट कर्फ्यूच नाही तर ‘या’ जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More