Top News

“उद्धव ठाकरेंना कशाला भेटायचं, शरद पवारच सरकार चालवत आहेत”

सांगली | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची वाढीव वीज बिलासंदर्भात भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी त्यांना शरद पवारांना भेटण्याचा सल्ला दिला आहे. यावरून चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर टीका केली.

राज्यपालांनी काय सांगितलं हे मला माहीत नाही. ते कोणत्या हेतूने बोलले हेही मला माहीत नाही. त्यामुळे त्यावर बोलता येणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

मला जर विचारालं तर सांगेन सध्या शरद पवारच राज्य चालवत आहेत. तेच बाहेर फिरत आहेत. उद्धव ठाकरे फिरतच नाहीत. म्हणून राज्यपालांनी राज ठाकरेंना तसं सांगितलं असावं, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सहज उपलब्ध होतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना कशाला भेटायचं अशी लोक भावना झाली आहे. ही वस्तुस्थिती आहे, असं सांगतानाच मी फक्त खुर्चीत बसतो. सत्ता चालवण्याचं कंत्राट तुम्हाला घ्या, असा करार ठाकरे-पवारांमध्ये झाला असावा, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय.

महत्वाच्या बातम्या-

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं निधन

“मी खुर्चीत बसतो, सत्ता चालवण्याचं कंत्राट तुम्ही घ्या”

भारत 2024 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य पूर्ण करणार- नरेंद्र मोदी

“मैं देश नहीं झुकने दूंगा हेच मोदी सरकारचे ब्रीद आहे”

राज्यपाल म्हणाले पवार साहेबांशी बोलून घ्या- राज ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या