कोल्हापूर महाराष्ट्र

उद्धव ठाकरे हे प्रशासनासाठी जन्मले नाहीत, ते तर…- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर | उद्धव ठाकरे यांनी उभं आयुष्य पक्ष चालवण्यात घालवलं. त्यांचा प्रशासनाशी काय संबंध? उद्धव ठाकरे हे प्रशासनासाठी जन्मले नाहीत. ते पक्ष चालवण्यासाठीच जन्मले आहेत, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

महाविकास आघाडीला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे यांना प्रशासनाशी संबंधित शंभर प्रश्न विचारले तर कॉपी करूनही उत्तरं देता येणार नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

उद्धव ठाकरे हे प्रशासनासाठी जन्मले नाहीत. ते पक्ष चांगला चालवू शकतात. ते कधी आमदार झाले नाहीत. कधी खासदार झाले नाहीत. कधी नगरसेवकही झाले नाहीत आणि स्थायी समितीचे अध्यक्षही झाले नाहीत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“अडचणीत आणायचा प्रयत्न केला तर महाविकास आघाडी अधिक बळकट होईल”

“फक्त गाण्याचा एक कार्यक्रम ठेवा, मग कराची आपलीच”

‘शाळा सुरु करा, आमचं नुकसान होतंय’; विद्यार्थ्याचा थेट मुख्यमंत्र्यांना मेसेज

‘आम्ही चौकशीला घाबरत नाही’; प्रवीण दरेकरांचं सरकारला आव्हान

भारतीय गोलंदाज झहीर खानला आमदार बनवा; राज्यपालांकडे पत्राद्वारे विनंती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या