बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शेतीतलं काही कळत नाही”

पुणे | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फक्त खुर्ची महत्त्वाची आहे. त्यांना शेतीमधले काहीही कळत नाही, अशी टीका भाजपप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांच्या हिताचं काहीही पडलेलं नाही. मोदी सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांचे स्वागत राज्यभर होत असताना हे सरकार शेतकरी हिताच्या आड येत असून आंधळं, बहिरं झालं आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केलीये.

काहीं दिवसांपूर्वी या कायद्याला पाठिंबा देणाऱ्यांना दिल्लीवरुन मॅडमचा रेटा आल्याने केवळ खुर्ची टिकवण्यासाठी कायद्याला स्थगिती दिली गेली. परंतु केंद्राचा कायदा श्रेष्ठ ठरत असतो. कायद्याला स्थगिती देता येत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

“मराठा समाजाची माफी मागा, अन्यथा तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही”

…म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चक्क मराठीतून केलं ट्विट!

आपली कोरोनाविरुद्धची लढाई अद्याप सुरूच आहे- शरद पवार

वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे केसी महाविद्यालयाने परीक्षा पुढे ढकलल्या; ‘या’ तारखेला होणार पेपर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More