कोल्हापूर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यावेळी केलेल्या भाषणात भाजप पक्ष, मोदी सरकार, राणे परिवार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
दसऱ्याचं भाषण होतं की शिमग्याचं?, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांनी बोलताना उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते.
काय ही भाषा जरा तुमच्या भाषेचा विचार करा, असा चिमटा काढत या भाषणातून महाराष्ट्रातील कोणत्याच विषयावर काहीच भाष्य करण्यात आलं नाही. भाषणात एकच मुद्दा होता तो म्हणजे भाजप, असं पाटील म्हणाले.
दरम्यान, कोण हिंदुत्ववादी आहे आणि कोण हिंदुत्ववादी असल्याचं ढोंग करतंय हे जनतेला माहीत आहे. आम्ही काय आहोत हे तुम्हाला निवडणुकीतच दाखवून देणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
“सरकारने न्यायालयात योग्यरित्या बाजू मांडली, आज आमची मागणीही मान्य झाली”
‘पावसाळा संपला तरी बेडकांची डराव-डराव संपली नाही’; शिवसेनेचं पुन्हा राणेंवर टीकास्त्र
“मराठा आरक्षणाची सुनावणी चार आठवडे पुढे ढकलण्यात आली याला सरकार जबाबदार”
राष्ट्रवादी खासदार सुनिल तटकरे यांना कोरोनाची लागण
‘कोरोना गो’ म्हणणाऱ्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण
Comments are closed.