मुंबई | मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणातील टीकेमुळे भाजप पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेवरून शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना धारेवर धरलं आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही ठाकरेंवर टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक फेसबूक पोस्ट केली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अजून किती दिवस पोळ्या भाजणार? खुर्चीसाठी त्यांनी दिलेल्या हिंदुत्वाच्या शिकवणीचे पालन करणं तुम्ही विसरला आहात, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
ज्यांच्या स्मारकाठिकाणी तुमचा कालचा कार्यक्रम चालला होता. त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हिंदुत्वदेखील तुमच्या पचनी पडले नाही. संरसंघचालक मोहन भागवत यांच्याच मार्गाने आम्ही चालत असल्याचं पाटील यांनी पोस्टमध्ये सांगितलं आहे.
दरम्यान, मी कुटुंबप्रमुख आहे, असं काल तुम्ही म्हणालात. याशिवाय काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी दौऱ्यावेळी हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, असं वक्तव्य तुम्ही केलं होतं. मग जे कुटुंब बळीराजाच्या जीवावर चालतं त्यांच्यावर एकही शब्द न बोलता काल जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या सद्यपरिस्थितीचा उल्लेख करणं टाळलं असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
‘मुख्यमंत्र्यांच्या भाषणात भाजपची दहशत याचाच आनंद’; भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
…तर आमचाही तोल जाईल आणि मातोश्रीच्या आतल्या गोष्टी बाहेर काढेन- नारायण राणे
रामदास आठवलेंच्या उपस्थितीत अभिनेत्री पायल घोषचा ‘आरपीआय’मध्ये प्रवेश!
“मुख्यमंत्री सावरकरांबद्दल एकही शब्द का बोलले नाहीत? त्यांना नव्या मित्रांची भीती वाटत असावी”
Comments are closed.