बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“या देशात लोकशाही आहे, दंडुकेशाही चालणार नाही”

मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत शिवसेना भवन समोर काल झालेल्या शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमधील वादावर भाष्य केलं आहे. यावेळी पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले.

तुम्ही काय वाटेल ते लिहिणार आणि आम्ही त्यावर रोषही व्यक्त करायचा नाही का? असा प्रश्न या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला विचारला आहे. तसेच आपल्या देशात लोकशाही आहे, दंडुकेशाही चालणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला खडसावून सांगितलं आहे.

शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये काल शिवसेना भवनासमोर चांगलाच राडा पाहायला मिळाला. त्याच पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. याबरोबरच मराठा आरक्षणाच्या संदर्भात प्रतिक्रिया देत असताना सारखी संस्थेला बळकट करण्याची गरज असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, हे देखील त्यांनी आवर्जून बोलून दाखवलं.

मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलं. कारण, नेहमीच्या अधिवेशनाच्या 3 तासात हा मुद्दा चर्चिला जाऊ शकत नाही. त्यामुळेच विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी आग्रही असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या –

 

 

 

 

 

 

 

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More