“उद्धव ठाकरे भाग्यवान माणूस, मला त्यांची कुंडली पहायची आहे”
मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सातत्यानं खळबळ माजवणारे वक्तव्य करत आहेत. आताही पाटील यांनी राज्यात काहीतरी घडणार असल्याचं भाकीत वर्तवलं आहे. पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
मला उद्धव ठाकरेंची कुंडली पहायची आहे. काय भाग्यवान माणूस आहे, कशाचं सोयर सुतक नाही, काही काम नाही, पण त्यांना कुणी हालवू शकत नाही, अशी टीका पाटील यांनी केली आहे. पाटील यांनी ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर येत आहे.
राज्य सरकारकडून पोलीस दलाचा गैरवापर केला जात आहे. भाजप नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडीसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपापल्या बॅगा भरून ठेवल्या आहेत, असंही पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, सांगलीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारकाच्या वादावर देखील पाटील यांनी भाष्य केलं आहे. राज्य सरकार वाद वाढवत असल्याचं पाटील म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या –
“अजितदादा तुम्हीच राज्य चालवताय, मुख्यमंत्री कधीतरी दिसतात”
राजमौलींच्या ‘RRR’ची बॉक्स ऑफिसवर जादू, पहिल्याच दिवशी मोडले कमाईचे सर्व रेकॉर्ड
“संजय राऊतांचं ‘हे’ वक्तव्य म्हणजे त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचं लक्षण आहे”
“एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावं, कोणाचीही नोकरी जाणार नाही”
“कोरोनापेक्षा सध्या सुरू असलेलं राजकारण भयंकर”
Comments are closed.