“महाराष्ट्र हा देशातच आहे, सांगा रे त्यांना कुणीतरी”
मुंबई | सक्तवसूली संचनालयानं महाविकास आघाडीशी संबंधितांवर कारवाई केली आहे. ईडीच्या कारवाईवरून राज्यासह देशात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. शिवसेनेकडून केलेल्या टीकेला आता भाजपकडून उत्तर येत आहे.
आमच्यावर दिल्लीतून मिसाईल हल्ले होत आहेत, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले होते. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला, मागचा-पुढचा कसलाही विचार न करता बोलणं हे विश्वप्रवक्ते संजय राऊतांच काम आहे, असं पाटील म्हणाले आहेत.
आता काय तर म्हणे दिल्लीतही पुतिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून महाराष्ट्रावर मिसाईल हल्ले होत आहेत. भारत हा आपला देश आहे आणि महाराष्ट्र हा देशातच आहे, सांगा रे त्यांना कुणीतरी, अशी टीका पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, ईडीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेव्हणे श्रीधर पाटणकरांवर कारवाई करण्यात आल्यानंतर राज्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद वाढला आहे.
थोडक्यात बातम्या –
महात्मा गांधींबद्दल बोलताना बंडातात्यांची जीभ घसरली, म्हातारा उल्लेख करत म्हणाले…
“मला प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली तर सोनं करुन दाखवेन”
“होय, आम्ही नेहरू-गांधी घराण्याचे गुलाम आहोत”
“एक पुतिन दिल्लीत बसलेत, ते दररोज आमच्यावर मिसाईल्स सोडतायेत”
तरूणांसाठी गुड न्यूज; परिक्षा न देता मिळेल सरकारी नोकरी
Comments are closed.