बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चंद्रकांत पाटलांनी दिला उद्धव ठाकरेंना सल्ला, म्हणाले “रश्मी ठाकरेंना सामनाच्या…”

मुंबई | शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनाच्या माध्यमातून भाजपवर जोरदार टीका केली आहे. सध्या सामनाच्या संपादकपदावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे या आहेत. रश्मी ठाकरे संपादक असताना आक्षेपार्ह भाषेत विरोधकांवर टीका करण्यात येत आहे. परिणामी राज्याचं राजकारण सध्या तापलं आहे.

संजय राऊतांना मातोश्री डळमळीत करायची आहे का?, राऊत कुणाच्या इशाऱ्यावर चालतात हे सर्वांना माहित आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. सामनाच्या भाषेबाबतही पाटील यांनी स्पष्ट शब्दात तक्रार केली आहे. सामनामध्ये कसली भाषा वापरण्यात येत आहे हे अवघा महाराष्ट्र पहात आहे, असं पाटील म्हणाले आहेत.

रश्मी वहिनी सामनाच्या संपादक आहेत त्यांना बदला आणि अनिल परब यांना संपादक करा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पाटील यांनी अनिल परब यांना संपादक करा, अशी मागणी केल्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण सध्या सामनाचं काम अधिकतर राऊत पाहत असतात. राज्यात सध्या मुद्दा कोणताही असो विरोधक रश्मी ठाकरेंचं नाव घेत आहेत.

दरम्यान, सामनाच्या माध्यमातून विरोधकांवर जहरी टीका केली जात आहे. संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत विरोधकांना नामोहरण केलं आहे. त्यानंतर राज्यात वाद वाढला आहे.

थोडक्यात बातम्या – 

“पवार कुटुंबीयांचे शेअर्स आहेत की नाहीत…”; राजू शेट्टींचे ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

लेकीमुळं उद्भवला शिवसेना-राष्ट्रवादी वाद; अखेर बाबांना द्यावं लागलं स्पष्टीकरण

‘मनसुख हिरेनच्या हत्येची सुपारी शिवसेनेने दिली’, किरीट सोमय्यांच्या दाव्याने नवी खळबळ

ऐतिहासिक निर्णय, अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणातील तब्बल ‘इतक्या’ दोषींना फाशीची शिक्षा

‘सगळे हिशेब ह्याच जन्मात चुकते करणार’, निलेश राणेंची तोफ कडाडली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More