बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अर्णब आमचा पोपट नाही, आम्ही पोपट वगैरे पाळत नाही”

मुंबई | अर्णव आमचा पोपट नाही, आम्ही पोपट वगैरे पाळत नाही, पोपट तेच पाळतात, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावलाय.

नाईक कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. पण अर्णव गोस्वामी यांना आज ज्याप्रकारे अटक झाली आहे ते निषेधार्ह आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

अर्णव यांनी विरोधात बोलल्यामुळे राज्य सरकार कुठलीतरी संधी शोधत होतं. त्यातूनच ही कारवाई झाली. या प्रकरणासाठी आंदोलन, निषेध व्यक्त करणार. पत्रकार, महिला किंवा ज्यांनी आत्महत्या केली त्यांचे कुटुंबीय असूद्या, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात सगळ्यांनी उतरलं पाहिजे. यामध्ये राजकारण करण्याची आवश्यकता नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

मोठ्या टीव्ही चॅनलच्या संपादकाला तुम्ही फरपटत नेता, तो विनंती करतो, माझ्या आईला औषधं देऊ द्या, मग निघूया. पण ते एकलं जात नाही. या गोष्टीचं आम्ही समर्थन करणार नाही, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली.

महत्वाच्या बातम्या-

अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल म्हणाले…

“अर्णब गोस्वामींच्या अटकेवर सोनिया गांधी आणि पवारांनी भूमिका स्पष्ट करावी”

ठाकरे सरकारला याची किंमत मोजावी लागणार- किरीट सोमय्या

“नववीत असताना अन्वय नाईकांच्या प्रेमात पडले, गोस्वामींच्या अटकेने करवाचौथला फळ मिळालं”

“गोस्वामी भाजपचे कार्यकर्ते आहेत?, त्यांच्या अटकेवरून इतकी ओरड का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More