बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिल्लीत प्रचाराला गेलेल्या चंद्रकांत पाटलांची केजरीवालांवर सडकून टीका

नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने वेगवेगळ्या राज्यांतील प्रमुख नेत्यांना त्यांच्या राज्यातील रहिवासी राहत असलेल्या भागात सभा घेण्याची जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्रातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीकरांना मोठ्या प्रमाणावर आश्वासने दिलं होतं. प्रत्यक्षात मात्र त्यांनी काहीच केलं नाही. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आश्वासने कमी दिली. मात्र कामे त्यापेक्षा जास्त करून दाखवली, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी केजरीवालांवर निशाणा साधला.

दिल्लीच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या सोबत पाटील सुद्धा प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. तर भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ते विविध भागात जाऊन ‘डोर टू डोर’ मतदारांची भेट घेत आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्याभरापासून चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत ठाण मांडून आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

संभाजी राजेंची मालिका संपताना अमोल कोल्हे भावूक…. केला हा खास व्हिडीओ ट्विट!

‘अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का?’; मुख्यमंत्र्यांवर टीका करताना शेलारांची जीभ घसरली

महत्वाच्या बातम्या- 

“संजय राऊतांनी घेतलेली मुलाखत म्हणजे ‘अनैसर्गिक आघाडी’चा खुलासा करणारी”

‘आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेत नाही’; शेलारांच्या वक्तव्याचा आव्हाडांकडून समाचार

मी दोन भावांच्या कात्रीत सापडलो होतो- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More