पुणे महाराष्ट्र

काळ कठीण आहे फोन बंद ठेवू नका, 3 वाजताही कुणी फोन केला तरी उचला- चंद्रकांत पाटील

पुणे | हा काळ कठीण आहे फोन बंद ठेवू नका. नगरसेवकांनी पहाटे 3 लाही लोकांचे फोन स्वीकारावेत, त्यांनी फोन बंद ठेवता कामा नये, अशी सूचना भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंदक्रात पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे.

पुण्यात भाजपची बैठक पार पडली. या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार मुक्ता टिळक, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे यांच्यासह पुणे शहरातील अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.

सामान्य लोकांना मदतीची आवश्यकता असून प्रत्येक नगरसेवक, भाजपच्या कार्यकर्त्यांना यात सक्रीय राहिलं पाहिजे, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

सर्व ताकदीनिशी मदत करा. शहरात रुग्णवाहिकांची कमतरता आहे. त्यासाठी खासगी कारमध्येही रुग्णवाहिका तयार करा. या गोष्टींना येणारा खर्च भाजप करेल मात्र लोकांना अडचणी येऊ नयेत याची काळजी घ्या. सर्वसामान्य रुग्ण,ज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे त्यांची रुग्णालयातील बिले भरण्यास मदत करा, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या- 

महाराष्ट्रात मुघल सत्तेत आले आहेत म्हणून इथं तसं काही होईल वाटत नाही- निलेश राणे

…नाहीतर माझी जवानी अशीच निघुन जाईल; कोरोनाग्रस्त ‘या’ अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

पुणे जिल्ह्यातील सर्व संशयितांबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतला मोठा निर्णय

रामदास आठवले हे अर्धशटर बंद झालेलं दुकान आहे- अनिल परब

“मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा पद्धतशीर वापर केला जात आहे”

पुणे जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा गेला एक लाखांच्या वर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या