बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दिल्ली दंगल हा मुस्लीम किंवा काॅंग्रेसचा नव्हे तर डाव्यांचा डाव”

पुणे | सीएए विरोधात तयार झालेलं वातावरण आणि दिल्लीतील दंगल हा मुस्लीम किंवा काॅंग्रेसचा नव्हे तर डाव्याचा डाव असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पुण्यातील शिवसमर्थ प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपचे चिटणीस सुनील देवधर उपस्थित होते.

शहरी नक्षलवाद पसरु पाहात आहे, या शहरी नक्षलवादाची चौकशी करण्याची मागणी होत असल्यानं डावे अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळेच सीएएचा मुद्दा पुढे करत देश अस्वस्थ करण्याचा प्रयत्न डाव्यांकडून सुरु आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

मुस्लीमांना सांगितलं जातं की दिल्लीत जेल बांधणार आणि सगळ्यांना तिथं टाकणार. मात्र हे कसं शक्य आहे?, भारतात २५ कोटी मुस्लीम आहेत एवढे सगळे तुरुंगात बसतील का? मुस्लीमांचा दिशाभूल केली जातेय, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

काॅंग्रेस राष्ट्रवादीला देशहित कळत नाही. ते सत्तेसाठी या आंदोलकांना पाठिंबा देत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीवही त्यांना पाठिंबा देत आहेत, आपल्याला खरंच काय वाटतं? हे त्यांनी एकदा स्वत:च्या मनाला विचारुन पाहावं, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

ट्रेंडिंग बातम्या-

वंचितला खिंडार; माजी आमदारासह 44 पदाधिकारी करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

…म्हणून अमृता फडणवीस ट्रोल होतात- अदिती तटकरे

महत्वाच्या बातम्या-

राज ठाकरे-मिलिंद एकबोटे यांच्या भेटीवर भुजबळ म्हणाले…

“सांगितलेलं ऐकलं असतं तर आबा आज आपल्यात असते

भारतीय महिला संघाच्या पराभवावर शरद पवार म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More