महाराष्ट्र मुंबई

“धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, अन्यथा…”

मुंबई | सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपींची चौकशी होईलच. पण मुंडे यांनी स्वत: कबुली दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. त्यांचा राजीनामा नाही घेतला तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलाय.

धनंजय मुंडे यांना प्रथमत: आवाहन करेल की माणूस म्हणून चूक घडू शकते. पण नैतिकतेने ते कायद्यात बसणार नाही. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

नैतिकता आणि कायदा या दोन्हींच्या चोकटीत न बसणारी गोष्ट केल्यानंतर समाजाचं नेतृत्व करणाऱ्या एखाद्या महत्त्वाच्या पोस्टवर त्यांनी राहायचं की नाही? ते अतिशय संवेदनशील आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकवेळा अशाप्रकारचे आरोप झाल्यानंतर त्या त्या वेळेला मंत्र्यांनी स्वत: हून राजीनामे दिलेले आहेत, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

धनंजय मुंडे यांच्या कबुली जबाबावर कुणीही आरोप केलेले नाही. धनंजय मुंडे यांचे 15 वर्षे महिलेशी संबंध होते. त्या महिलेपासून त्यांना दोन मुले आहेत. त्या मुलांना मुंडेंचं नाव दिलं गेलं आहे. महिलेच्या बहिणीने मुंडेंवर बळजबरी केल्याची तक्रार केली आहे. याबाबत पोलिसांनी शाहनिशा करावी, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘प्यार किया तो डरना क्या’; या शिवसेना नेत्याने केली धनंजय मुंडेंची पाठराखण

‘…तर नियमाप्रमाणं धनंजय मुंडे यांना शिक्षा व्हावी’; चित्रा वाघ आक्रमक

अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडेंनी घेतली शरद पवारांची भेट!

कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही- जयंत पाटील

धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ?; ‘या’ नेत्याने निवडणूक आयोगाकडे केली तक्रार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या