बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“विधानसभा निवडणूक कधीही होवो, स्वबळावर जिंकण्यास भाजप सज्ज”

मुंबई | विधानसभेची मध्यावधी किंवा नियमित अशी कधीही निवडणूक झाली तरी स्वबळावर सर्व 288 जागा लढवून पूर्ण बहुमताने विजय मिळविण्यास भाजप सज्ज आहे, असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

राज्यात मध्यावधी किंवा नियमित अशी केव्हाही विधानसभा निवडणूक झाली तरी स्वबळावर सर्व जागा लढवून पूर्ण बहुमताने विजय मिळविण्याची भाजपची तयारी आहे. लोकसभेच्याही राज्यातील सर्व 48 जागा स्वबळावर लढविण्याची भाजपची तयारी आहे. असं त्यांनी म्हटलंय.

मतभेदानंतरही महाविकास आघाडीचे घटक पक्ष सत्तेसाठी एकत्र राहिले आणि भाजपच्या विरोधात एकत्र लढले तरी निवडणुकीत त्यांचा सामना करण्याची तयारी भाजपने केली आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

दरम्यान, सरकार पडेल की टिकेल याचा विचार न करता एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून भाजपा ठामपणे काम करत आहे. विदर्भ मराठवाड्यातील प्रचंड पुरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नसले तरी पूरग्रस्तांना भेटण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांचा दौरा सुरू झाला आहे, अशी टीकाही त्यांनी केलीये.

थोडक्यात बातम्या- 

‘…तर शेतकरी तुमच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही’; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

IPL 2021: एकाच दिवशी मुंबईला दोन धक्के, सामना तर गमावलाच पण…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; ठाकरे सरकारमधील मंत्र्याने दिली महत्वाची माहिती

सरकारने एअर इंडियाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही- पीयूष गोयल

“फडणवीसांना मी सांगितलंय, काहीही करा पण पवार साहेबांचा नाद नाही करायचा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More