पुणे | भाजपच्या पहिल्या यादीत पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव आलेलं नाही. खडसेंच्या उमेदवारीबाबतच्या प्रश्नावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजून एक यादी जाहीर होणार असून ‘देर है अंधेर नही’ असं म्हटलंय.
पुण्यातील भाजपच्या मेळाव्यात चंद्रकांत पाटील बोलत होेते. यावेळी त्यांना खडसेंच्या उमेदवारीबाबत पत्रकारांनी विचारणा केली. त्यावर अनेक नेते उमेदवारीसाठी मला येऊन भेटले त्याप्रमाणे रक्षा खडसे याही मला भेटल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.
भाजपकडून 125 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहेत. त्यांमध्ये खडसे यांचं नाव नसल्याने त्यांचं तिकीट भाजपने कापल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
एकनाथ खडसे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाच्या पहिल्या यादीत स्थान न मिळाल्याने खडसे यांना नाराजी लपवता आली नाही. आपण चार दशके पक्षाशी एकनिष्ठ असून, पक्ष योग्य निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या-
मनसेला सगळ्यात मोठा धक्का; नितीन नांदगावकर यांनी हाती घेतलं धनुष्यबाण! https://t.co/F49FApqmMi @NNandgaonkar9 @mnsadhikrut
— थोडक्यात (@thodkyaat) October 3, 2019
पार्थप्रमाणे पराभव वाट्याला येऊ नये म्हणून प्रयत्न करावे लागतील-https://t.co/VzImpSQbog #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 2, 2019
राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, या ७७ जणांना दिली संधी- https://t.co/3kAolZQTrk #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 2, 2019
Comments are closed.