औरंगाबाद | तीन तीन महिन्यांचा तर आमदार करता येत नाही, त्यासाठी घरात काही जणांना नाराज करावं लागतं, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीवेळी कोथरुड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापण्यात आलं होतं. या संदर्भात औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.
एकाला न्याय तर बाकीच्यांवर अन्याय असं होतंच असतं. संग्राम देशमुख हा काही माझा जावई नाही, मेधा काही दुश्मन नाही, असं चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीही मेधा कुलकर्णी यांनी विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यावरून नाराजी व्यक्त केली होती.
महत्वाच्या बातम्या-
हायकोर्टाने स्वत: दखल घेऊन अर्णब गोस्वामींच्या धक्काबुक्कीची चौकशी करावी- देवेंद्र फडणवीस
तासाभरात 1 महिन्याचा, तर दिवाळीपूर्वी 2 महिन्यांचा पगार आणि बोनस जमा करणार- अनिल परब
अर्णब गोस्वामींना अंतरिम जामीन नाहीच, कोर्टाने अर्ज फेटाळला
महाविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीचं आणि संवेदनाहीन, गिरीश महाजन यांची टीका
“उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटीच नाही, तर मराठी सिनेमेही बनवणार”