Top News पुणे महाराष्ट्र

“नरेंद्र मोदींनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं”

Photo Credit- Facebook/ Narendra Modi & Chandrakant Patil

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, असं अजब वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने तरुणाईला जोडण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या युवा वॉरियर्स अभियानाचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यात झाला. यावेळी ते बोलत होते.

काही जण नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध काहीतरी काळंबेरं पसरवत असतात. पण अब्दुल कलाम यांच्यासारख्या कर्तृत्वान माणसाला, संशोधक माणसाला नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती केलं, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

देशभक्त मुस्लिम आणि देशद्रोही मुस्लिम यांच्यातला फरक समजावून सांगताना काश्मिरमध्ये बॉम्बस्फोट करणारा मुस्लिम देशद्रोही तर देशसाठी झटणारा मुस्लिम देशभक्त मुस्लिम असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

मोदींनी मुस्लिम समाजातल्या महिलांच्या पायातली बेडी तोडली. तीन तलाकचा कायदा रद्द केला, असंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पेट्रोल भरताना तरूणाने केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

हे सरकार दारुडं सरकार आहे- सदाभाऊ खोत

अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईल- रामदास आठवले

पुण्यात आता मास्क न घातल्यास ‘इतका’ दंड भरावा लागणार!

आम्ही दारुच नाही, गांजाही विकला असेल, पण…- सदाभाऊ खोत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या