बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…त्यामुळे पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाहीत- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर | मुंडेंनी महाराष्ट्रातील भाजपला संघर्ष करणारी संघटना म्हणून ओळख निर्माण करून दिली. अशा घरात जन्मलेल्या पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

एखादी गोष्ट घडली ती आवडली नाहीतर भावना व्यक्त करण्याचा कार्यकर्त्यांना अधिकार आहे. त्यानुसार त्यांनी भावना व्यक्त केल्या. प्रीतम ताईंना मंत्रिमंडळात घेतलं जावं हे त्यांना वाटत होतं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा बारकाईने निर्णय घेतात. त्यांनी पद्म पुरस्कार देतानाही शोधून शोधून पदं दिलं, लोकांच्या ध्यानीमनीही नव्हतं अशा लोकांनाही दिलं. राजकारणताही सेम आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

न्याय सर्वांनाच एकावेळी मिळू शकत नाही. भागवत कराडांना मंत्रिपद मिळालं तर प्रीतम यांना नाही मिळालं. राणेंना मिळालं तर रणजीत निंबाळकरांना नाही मिळालं. केंद्रीय मंत्रिमंडळात 28 जणांना जोडायचं होतं. त्यानंतर 12 मंत्र्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे 40 जणांना जोडायचं होतं. देश मोठा आहे. त्यात न्याय मिळतानाच कुणावर तरी अन्याय होतो. त्यात नेता नव्हे कार्यकर्त्याने रिअॅक्ट होणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. त्यात काही चुकीचं नाही. पण लगेच सावरणं हे सुद्धा समजदारीचं लक्षण आहे. ते काल पंकजा यांनी केलं, असंही चंद्रकांत म्हणाले.

दरम्यान, मला प्रवास खडतर दिसतोय. मागेही खडतर होता. पुढेही खडतर आहे. मी आज निवडणुकीत पडले असले तरी संपले नाही. मी संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते. पण मी संपलेली नाही. मी आहे. मी तुमच्या जीवावर आहे, असं पंकजा म्हणाल्या होत्या.

थोडक्यात बातम्या- 

“ताई, तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मामु मोठा चतुर आहे, हे विसरू नका”

‘आम्हाला जेवायला बोलवा, आम्ही स्वबळावर जेवायला येऊ’; मुख्यमंत्र्यांचे काँग्रेस नेत्यांना चिमटे

मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक; ‘हे’ मोठे निर्णय घेण्याची शक्यता

संजय राऊतांनी माझ्या मनातलं बरोबर ओळखलं- नाना पटोले

पुलवामात सुरक्षा दलाला मोठं यश; लश्कर ए तोयबचे तीन अतिरेकी ठार

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More