बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रश्मी वहिनींकडून अशा टीकेची अपेक्षा नाही- चंद्रकांत पाटील

मुंबई | शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली. यानंतर आज सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर शेलक्या शब्दांत टीका करण्यात आली. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रतिक्रिया दिली आहे.

सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे या कर्तृत्ववान आहेत. त्यांचं मी कौतुक केलं होतं. मला रश्मी वहिनींकडून अशा टीकेची अपेक्षा नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी सामनातून करण्यात आलेल्या टीकेला पाटलांनी प्रत्युत्तर दिलं.

असे अनेक दादामियां गोधड्या भिजवत होते तेव्हा शिवसेना हिंदुत्व आणि राष्ट्रकार्यासाठी छातीचा कोट करून लढत होती, असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून चंद्रकांत पाटलांवर टीका करण्यात आली होती.

दरम्यान, आम्हालाही टीका करता येते. मात्र कुणीही मर्यादा सोडू नये. मी अग्रलेख लिहित नाही असं रश्मी वहिनी म्हणत असतील तर संपादक का झालात? हा प्रश्न आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या- 

“महात्मा गांधींचा चित्रपट टीव्हीवर लागला की बायको कपाळाला हात लावते”

मराठा आंदोलकांचं बरं वाईट झाल्यास सरकार जबाबदार- छत्रपती संभाजीराजे

महत्वाच्या बातम्या- 

…तो पेन ड्राईव्ह ठरणार इंदोरीकरांसाठी डेंजर; अडचणी वाढणार?

‘खासदार सुजय विखे आता फोनही उचलत नाहीत’; तृतीयपंथी मतदारांचा उद्वेग

महाविकास आघाडीकडून भाजपचा धुव्वा; या निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार पराभूत!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More