बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पक्षाने किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीयेत- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार चार वेळेस पत्र लिहून भेट मागितली पण संभाजी छत्रपतींना मोदींनी भेट दिलेली नाही. त्यावर खुद्द संभाजी छत्रपतींनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर भाजप नेते आणि संभाजीराजे यांच्यात मतभेद वाढताना दिसत आहेत.

भाजपनं पक्ष म्हणून किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीयेत. तसेच केला गेलेला सन्मान हा बहुदा इतरांना माहित नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. संभाजी छत्रपती हे मोदीविरोधी भूमिका घेतायत का? अशी चर्चाही सध्या होत आहे. मात्र चंद्रकांत पाटील यांनीही संभाजीराजे व्यक्ती म्हणून काय करतात त्याचं त्यांना स्वातंत्र्य असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.

अहमदाबादमध्ये खा. संभाजी छत्रपतींंच्या सन्मानार्थ मोदींसह सर्वजण उभे राहीले. एवढंच नाही तर शाहुंच्या वंशजांना पक्ष कार्यालयात बोलावू नका असंही मोदी म्हणाल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती सोलापुरात आले असता पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना त्यांनी थेट राजीनामा द्यायला तयार असल्याचं बोलून दाखवलं होतं. राजीनाम्याने जर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर तात्काळ राजीनामा देईन, असं संभाजीराजे म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या- 

‘मराठा आरक्षणासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा’; संभाजीराजेंची पवारांकडे मागणी

फोन वरुन ओळख, लाॅजवर भेट अन् नंतर घडला धक्कादायक प्रकार

नेहरूंच्या स्मृतीदिनी वाजपेयींचा व्हिडीओ शेअर करत जयंत पाटलांचा भाजपला टोला, पाहा व्हिडीओ

नदीवर पाणी प्यायला गेलेल्या कुत्र्यावर मगरीनं केला हल्ला अन्…, पाहा व्हिडीओ

लॉकडाऊनचं काय करायचं?; कॅबिनेट मंत्र्यांनाच कळेना,कुणी म्हणतंय वाढवावा, कुणी म्हणतंय नको!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More