महाराष्ट्र मुंबई

‘शरद पवारांचं राजकारण शुद्ध, त्यांच्यावर…’; चंद्रकांत पाटील यांचं मोठं वक्तव्य

मुंबई | शरद पवार यांनी नेहमीच नैतिकतेचे राजकारण केलं आहे. त्यांचं राजकारण शुद्ध मानलं जातं. त्यांनी नेहमीच नैतिकतेला प्राधान्य दिलं, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

शरद पवारांचं राजकारण शुद्ध, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाही. पवारांचं राजकारण नेहमी नैतिकतेचं राहिलं आहे. त्यामुळे ते धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतील असा विश्वास आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा. त्यांचा राजीनामा नाही घेतला तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिलाय.

धनंजय मुंडे यांना प्रथमत: आवाहन करेल की माणूस म्हणून चूक घडू शकते. पण नैतिकतेने ते कायद्यात बसणार नाही. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता ‘या’ विभागाची सांभाळणार जबाबदारी

धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या विरोधकांना अमोल कोल्हेंनी सुनावलं, म्हणाले…

“धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, अन्यथा…”

‘प्यार किया तो डरना क्या’; या शिवसेना नेत्याने केली धनंजय मुंडेंची पाठराखण

‘…तर नियमाप्रमाणं धनंजय मुंडे यांना शिक्षा व्हावी’; चित्रा वाघ आक्रमक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या