मुंबई | चंद्रकांत पाटलांना माझ्यावर पीएचडी करण्यासाठी 10 ते 12 वर्ष लागतील, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केलं होतं. यावर पवारांवर पीएचडी करण्यासाठी मी विद्यार्थी म्हणून 10-12 वर्ष अभ्यास करण्यास तयार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
एखादा विषय जेव्हा आपण मिशन म्हणून करतो. त्याला अभ्यास आणि संशोधनासाठी निवडतो तेव्हा त्यासाठी जो वेळ लागेल तो लागेल. त्यांना 12-13 वर्ष वाटत असेल पण कदाचित जास्तही लागेल. माझी त्याची तयारी आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
पावारांच्या 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा मला अभ्यास करायचा आहे. त्यासाठी वेळ देण्याची विद्यार्थी म्हणून माझी तयारी असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शरद पवार यांना मागील 50 वर्षात महाराष्ट्रात कधीही 5 ते 7 हून अधिक खासदारही निवडून न आणता देशाच्या राजकारणाच्या मध्यवर्ती कसं राहता आलं? हा माझ्या पीएचडीचा विषय असेल, असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.
ट्रेंडिंग बातम्या-
भाजपला नवी मुंबईत मोठा धक्का; 4 नगरसेवक शिवबंधन बांधणार
दिल्लीतील नेत्यांच्या नाराजीमुळे फडणवीसांचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात- मिटकरी
महत्वाच्या बातम्या-
“ठाकरे सरकार पोकळ आणि बहिरं असून या सरकारला मराठा समाजाप्रती आस्था नाही”
लेकीच्या बुरखा घालण्यावरून टीका करणाऱ्यांना ए. आर. रेहमानचं जोरदार उत्तर
कलमांतर्गत नियुक्त्या देता येतील पण सरकार का घाबरतंय??- फडणवीस
Comments are closed.