राज्यातील घडामोडींवर चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणतात…
पुणे | एकनाथ शिंदेंच्या राजकीय खेळीमुळे महाराष्ट्राचंच नाही तर संपुर्ण देशाचं वातावरण बदललेलं आहे. यावर अनेक नेते आणि मान्यवर आपली मते आणि प्रतिक्रिया देत आहेत. शिवसेनेने सर्व बंडखोर आमदारांना आणि त्यांचे नेते एकनाथ शिंदे यांना मुंबईत परत येण्याचं भावनिक आवाहन केलं आहे. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या बंडाला भाजपची फूस आहे, असा गंभीर आरोप केला आहे.
शरद पवार यांच्या या आरोपांवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे. राज्यातील सत्तापरिवर्तनाबद्दल आपल्याला काहीही माहित नाही. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. तसेच राज्यात ज्या उलथापालथी होत आहेत त्याच्याशी भाजपचा संबंध नाही. शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेचा कोणताही प्रस्ताव आम्हाला आलेला नाही. तो आल्यास कोअर समितीत निर्णय घेतला जाईल तसं घडेल. त्यानंतर मी जी मांडेन तीच पक्षाची भूमिका असेल असंही पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
पुढे बोलताना पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर सुद्धा टीका केली. संजय राऊत हेच शिवसेना संपवत आहेत असे मी यापुर्वीही बोललो आहे. ते सकाळी एक बोलतात आणि नंतर दुसरं याचाच फटका शिवसेनेला बसला आहे, असं पाटील म्हणाले.
भाजप नेते जरी आपली यात भूमिका नसल्याचं म्हणत आहेत तरी गेले दोन दिवस ज्या नाट्यमय गोष्टी घडत आहेत. त्या नजरअंदाज करण्यासारख्या नाहीत. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची दिल्ली वारी, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं शरद पवारांना दिलेले धमकीवजा इशारे, मोहीत कंबोज यांची गुवाहाटी येथे उपस्थिती, आसामच्या मंत्र्यांकडून शिंदे गटाचं स्वागत यामुळे खरोखरंच या बंडाला भाजपची फूस आहे का?, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
थोडक्यात बातम्या-
‘त्यांचा माज वाढलाय’; नारायण राणेंनी शरद पवारांना दिलेल्या इशाऱ्यावर संजय राऊत संतापले
“महाविकास आघाडी सरकार पडतंय त्याचं मला दुःख नाही फक्त…”
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या वक्तव्याने शिंदे गटाला मोठा धक्का!
’50 वर्षाच्या राजकारणात पवार साहेबांनी हे कमावलं’; निलेश राणेंचा पवारांना टोला
“शिवसेनेनं यापूर्वीही अशी गद्दारी पचवली, पुन्हा एकदा गद्दारांना गाडून आपला भगवा फडकवू”
Comments are closed.