बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…त्यामुळे मुंबई महापालिका शिवसेनेसाठी सोडली होती”

मुंबई | मुंबई महानगरपालिका भाजपाच्याच ताब्यात येणार आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

आम्ही मुंबई महानगरपालिका भाजपाकडे घेणार आहोत. मागच्या वेळी आम्ही जेव्हा 82 जागा जिंकलो त्यावेळी महापौर आमचाच बसला असता. पण अमित शाह यांनी आपल्याला राज्य चालवायचं असून मुंबई महानगरपालिका शिवसेनेला सोडा असं सांगितल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

शिवसेनेचे 84 आणि आमचे 82 नगरसेवक निवडून आले होते. आमचे केवळ दोन नगरसेवक कमी होते, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेत भाजपची स्वबळावर सत्ता आणण्याचा चंग बांधला आहे. या निवडणुकीमध्ये भाजपची स्वबळावर सत्ता आणून दाखवू असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्राच्या आणखी एका सुपुत्राला वीरमरण

धक्कादायक! मुंबईत 2 अल्पवयीन मुलांनी केला तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार

मुख्यमंत्रीपदासाठी सुप्रिया सुळेंना पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही, कारण…- चंद्रकांत पाटील

राज्यपाल समजूतदार आहेत, आमदारकीसाठी पाठवलेल्या नावांवर लवकरच निर्णय घेतील- छगन भुजबळ

शिवसेनेत सगळेच विद्वान एकापेक्षा एक; निलेश राणेंचा टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More