महाराष्ट्र मुंबई

नव्यांमुळे जुन्या पाठीराख्यांनी घाबरू नये- चंद्रकांत पाटील

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेते भाजपमध्ये येत असले तरी जुन्या लोकांनी घाबरण्याचं कारण नाही. त्यांच्यावर अन्याय होणार नाही, असा दिलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर विधानसभा मतदारसंघ सोडत नसल्याने भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा हर्षवर्धन पाटील यांनी केली होती. त्यानुसार बुधवारी गरवारे सभागृहात हर्षवर्धन पाटील यांचा भाजप पक्षप्रवेशाचा सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला.

हर्षवर्धन पाटील हे अखेर भाजपमध्ये आले. लोकसभा निवडणुकीच्या दोन दिवस आधी जरी ते भाजपमध्ये आले असते तर बारामती लोकसभा मतदारसंघाचा निकाल वेगळालागला असता, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने लोकांचा कल आहे. राज्यात लोकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवला आहे. प्रामाणिकपणे काम करता येईल असा भाजप हाच पक्ष उरला असल्याने पक्षात प्रवेश केल्याचं हर्षवर्धन यांनी जाहीर केलं.

महत्वाच्या बातम्या- 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या