नाशिक | दैनिक सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. ठाकरे कुटुंब स्वतःसाठी काही घेत नाही, असं मला उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. मात्र आता ठाकरे सगळंच घेताहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
सामनाच्या संपादकपदी निवड झाल्याने चंद्रकांत पाटील यांनी रश्मी ठाकरेंचं अभिनंदन केलं आहे. त्या खूप चांगलं काम करतील असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.
रश्मी वाहिनींना खूप खूप शुभेच्छा. आमचं सरकार असतांना त्यांना मी सिद्धिविनायक ट्रस्टचं अध्यक्षपद घ्या, म्हणून आग्रह धरला होता. उद्धव ठाकरे यांना मी स्वतः बोललो होतो. मात्र ठाकरे कुटुंब स्वतःसाठी काही घेत नाही असं उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी म्हटल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान, कुठलाही अनुभव नसताना त्यांनी मुलाला कॅबिनेट मंत्री पद दिलं. आता वहिनींना संपादक केलं. वहिनी ‘सामना’चं संपादक पद खूप चांगल्याने सांभाळतील, असा टोला पाटलांनी लगावला.
ट्रेंडिंग बातम्या-
एके काळी दगड खायचो, आता विरोधकांचं डिपाॅझिट जप्त करतो- नितीन गडकरी
…तर त्या शिवसैनिकाचं थोबाड फोडा; विनायक राऊतांची ताकीद
महत्वाच्या बातम्या-
“26 वर्षे लोकांना हसवतोय, मात्र आता माझ्यावरच रडण्याची वेळ आलीय”
इथे फक्त 15 हजार भारतात 1 लाख नागरिकांनी माझं स्वागत केलं- डोनाल्ड ट्रम्प
Comments are closed.