Top News अहमदनगर महाराष्ट्र

‘अजित पवारांमध्ये एवढी ताकद असती तर फडणवीसांचं सरकार टिकलं असतं’; चंद्रकांत पाटलांची पवारांवर टीका

अहमदनगर | जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप साहजिकच उमेदवार देईल. पण आम्ही तिन्ही पक्ष मिळून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करु, असं राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.

अजित पवारांमध्ये एवढी ताकद असती तर 80 तासांचे सरकार आले त्यावेळी त्यांनी आणलेले आमदार टिकवता आले असते. त्यांच्या आमदारांना त्यांनी सांभाळलं असतं तर फडणवीसांचं सरकार टिकलं असतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

भाजपचे आमदार नाराज असून लवकरच राष्ट्रवादीमध्ये मेगाभरती होणार असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलतात. मात्र तुम्ही सरकर चालवा आम्ही विरोधी पक्ष सांभाळू, असं पाटील यांनी म्हटलं आहे. साईबाबाच्या दर्शनासाठी पाटील शिर्डीमध्ये आले होते त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, निवडणूक संपल्यावर पाच वर्ष एकत्र काम करावं, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.  मात्र गेल्या वर्षात सरकार वाचवण्यासाठी विरोधकांना टार्गेट केलं जातं असल्याचं म्हणत पाटलांनी राज्य सरकारवर टीका केली.

थोडक्यात बातम्या-

मुंबईच्या रस्त्यांवर फिरतोय सांताक्लॉज; भेट म्हणून देतो मास्क आणि सॅनिटायझर

समितीतील सदस्यांना बोलण्याचा अधिकार नाही का?; राहुल गांधींचा सवाल

…अन् दिल्ली विधानसभेत केजरीवाल यांनी रागात कृषी कायद्याची प्रत फाडली!

“शिवसेनेच्या पराभवाचीही भरपाई करू

बापरे! हॉटेलमध्ये आलेल्या कस्टमरने दिली चक्क लाखो रूपयांची टीप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या