Top News महाराष्ट्र मुंबई

गृहमंत्री जी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता तर…- चंद्रकांत पाटील

मुंबई | भाजप खासदर रक्षा खडसे यांच्या नावाचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने भाजपच्याच वेबसाईटवर झाला होता. याची सगळीकडे मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या उल्लेखाबद्दल  ट्विट करत सांगितलं होतं. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनिल देशमुखांवर निशाणा साधला आहे.

याच्यामागे कोण आहे हे भाजप नक्कीच शोधून काढेल आणि कारवाई करेल. मात्र गृहमंत्री जी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता तर असा बदनामीकारक मजकुर आपण कधीच ट्विटमध्ये वापरला नसता, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

गृहमंत्र्यांनी भाजपची चूक दाखवून देत भाजपने दोषींवर कारवाई करावी असं म्हटलं होतं. यावरून पाटलांनीही ट्विट करत देशमुख यांच्यावर टीका केली.

दरम्यान, भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे जी यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नसल्याचं देशमुख यांनी म्हटलं होतं.

 

थोडक्यात बातम्या-

भाजपच्या अधिकृत वेबासाईटवर झालेल्या चुकीच्या उल्लेखावर रक्षा खडसे म्हणाल्या…

रक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली

येत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग

” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही?”

“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या