बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”त्या’ साखर कारखान्यांची यादी पाच वर्षापुर्वी अण्णा हजारेंनी केली’; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची कवडीमोलाने विक्री करून झालेल्या गैरव्यवहारावर कारवाई करण्याची विनंती केली. त्यानंतर जरंडेश्वर कारखान्यावर ईडीने कारवाई केली होती.

जरंडेश्वर साखर कारखाना विक्रीबाबत ईडीने केलेल्या कारवाईचे पाटलांनी स्वागत केलं. या पद्धतीने कारवाई होण्यासाठी 30 साखर कारखान्यांची यादी पाटलांनी पत्रासोबत केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठवली होती. चंद्रकांत पाटलांनी ज्या 30 साखर कारखान्यांची यादी पाठवली होती ती यादी त्यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली असल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

जरंडेश्वर हे हिमनगाचे टोक आहे. अशा प्रकारे मातीमोल किंमतीने विकल्या गेलेल्या कारखान्यांची चौकशी करा अशी मागणी मी केली आहे. मी जे पत्र केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना दिलं, ती कारखान्यांची यादी पाच वर्षांपूर्वी अण्णा हजारेंनी तयार केल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, अमित शहांना 30 साखर कारखान्यांच्या चौकशीसाठी चंद्रकांत पाटलांनी यादी पाठवली त्यानंतर अमित शहांकडे सहकाराची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे याबाबत अनेक चर्चांणा उधाण आलं. मात्र अमित शहांकडे सहकार देण्याचं नियोजन किमान वर्षभरापूर्वीपासून झालं असेल, असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

नाना पटोलेंच्या फोन टॅपिंग प्रकरणावरून वाद पेटला, अजित पवार म्हणाले…

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या!

सातारा जिल्हा बँक ईडीच्या रडारवर; जरंडेश्वर प्रकरणात सातारा जिल्हा बँकेला नोटीस

शेतकरी आंदोलन पुन्हा चिघळलं, पोलिसांशी हुज्जत घालत बॅरिकेट्स तोडले

नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू – चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More