बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्ही महाराजांचे वंशज आहोत औरंगजेबाचे नाही त्यामुळे औरंगाबादचं नाव ‘संभाजीनगर’ झालंच पाहिजे”

मुंबई | महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचे आम्ही वंशज आहोत. औरंगजेबाचे नाहीत त्यामुळे औरंगाबादचे नामकरण ‘संभाजीनगर’ झालंच पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

औरंगाबादच्या नामांतरासंदर्भात सर्वोच्च न्यायासयात एक याचिका दाखल आहे. त्याला गती देऊन शहराचे नाव बदललेच पाहिजे. औरंगजेब हा एक आक्रमणकारी होता. त्यामुळे या शहराचं नाव बदलून  धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावावरून करण्यात यावं, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन संघटनात्मक आढावा घेतला. यानंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटलांनी ही मागणी केली.

दरम्यान, ‘नाचता येईना अंगण वाकडं’ अशी महाविकास आघाडी सरकारची स्थिती आहे. कर्जमाफीच्या नुसत्या घोषणा असून, प्रत्यक्षात अंमलबजावणी काही नाही, असं म्हणत पाटलांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

 

ट्रेंडिंग बातम्या-

‘मोदींनी जे गुजरातचं केलं तेच दिल्लीचं करत आहेत’; इम्रान खान यांचं मोदींवर टीकास्त्

मुसलमान असूनही स्वत:ला भारतात खूप सुरक्षित समजतो- अदनान सामी

महत्वाच्या बातम्या- 

रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यात पुन्हा खडाजंगी, पाहा काय आहे प्रकार…

पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील

महसूलमंत्रीच आपल्या बगलबच्च्यांना पाठीशी घालत आहेत – राधाकृष्ण विखे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More