Top News पुणे महाराष्ट्र

“आम्हाला महापालिकेत सत्ता द्या पहिल्या बैठकीत संभाजीनगरचा ठराव मंजूर करू”

पुणे | औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यावरून सध्या राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. शिवसेना-भाजप यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नामांतरावरून मोठं वक्तव्य केलं आहे.

आम्हाला महापालिकेत सत्ता द्या पहिल्या बैठकीत संभाजीनगरचा ठराव मंजूर करू, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पुण्यात पत्रकारांशी ते बोलत होते.

संभाजीनगर नाव ठेवण्यासाठी काँग्रेसने विरोध केला आहे. त्यामुळे हा जिव्हाळ्याचा विषय मार्गी लावण्यासाठी सत्ता पणाला लावायची की नाही, हे शिवसेनेला ठरवायचं आहे, असंही पाटील म्हणाले.

दरम्यान, औरंगजेब कुणाचा पूर्वज असू शकतो का?,  मग औरंगाबाद या नावाचा आग्रह कशासाठी. औरंगाबादऐवजी दुसरं नाव असेल तर त्याची चर्चा करा. संभाजीनगर हे नाव सगळ्यांना मान्य आहे. मग ते का द्यायचं नाही?, असा सवालही पाटलांनी यावेळी केला.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून मी या घडीला कोरोनाची लस न घेण्याचा निर्णय घेतला- शिवराज सिंह चौहान

हाडे गोठवणाऱ्या थंडीतही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू, 39 दिवसांत 54 शेतकऱ्यांचा मृत्यू

महत्त्वाची बातमी! पुण्यातल्या शाळा आजपासून सुरू

…तोपर्यंत मनसेसोबत युती शक्य नाही- चंद्रकांत पाटील

काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी मोदींसोबत पंगा घेणाऱ्या नेत्याची नियुक्ती होणार???

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या