बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्यपालांचा जो मान ठेवला पाहिजे त्याला धक्का देण्याचं काम केलं जात आहे”

पुणे | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्य सरकारमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून खटके उडताना दिसतात. दोन दिवसांपुर्वी मंत्रिमंडळातील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी राज्यापालांच्या तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यावर नाराजी व्यक्त करत राज्यपालांवर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यपालांचा जो मान ठेवला पाहिजे, राज्यपालांचं जे स्थान आहे त्याला धक्का देण्याचं काम केलं जातय. राज्यपाल त्यासाठी समर्थ आहे, राज्यघटना त्यासाठी समर्थ असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पुण्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

आम्ही या विषयाबद्दल जे चाललं आहे त्याबद्दल नापसंती व्यक्त करत असल्याचं पाटील म्हणाले. त्यासोबतच त्यांनी राज्यपालांच्या दौऱ्याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. राज्यपालांनी अशाप्रकारे विविध आपत्तीमध्ये स्वाभाविकपणे लोकांच्या भेटीगाठी घ्यायच्या असतात. विचारपूस करायची असते. निर्णय घोषित करायचे नसतात हे मान्य आहे, निर्णय घोषित करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याचं पाटील म्हणाले.

दरम्यान, लोकांनी निवडून दिलेले मुख्यमंत्री आहेत, मंत्री आहेत हे मान्य आहे. परंतु घटनेची रचना अशी आहे, की राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात आणि त्यांना एका अर्थाने मंत्रिमंडळाने अशाप्रकारे राज्याचा सामान्य माणसाचा एक-एक रुपया चांगल्या कामासाठी खर्च केला जाईल, यासाठी मंत्रिमंडळाने सहाय्य करायचं असतं, असंही पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

काय सांगता! कुत्रा मागे लागताच रेड्यानी ठोकली धूम, व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल पोट धरून

‘फडणवीसांचा टॅटू मी ह्रदयावर काढणार होतो पण…’; हातावर टॅटू काढलेल्या नरेंद्र पाटलांची प्रतिक्रिया

‘पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी होणार की नाही?’; ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा हा निर्णय

काँग्रेसला नवीन रणनीतीकार भेटला? सोनिया गांधी लवकरच निर्णय घेणार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More