बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘नवरा बायको भांडतात… नंतर एकत्र चहा पितात’; सेना-भाजप राड्यावर पाटलांचं सूचक वक्तव्य

मुंबई | भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून दादरमध्ये शिवसेना भवनावर मोर्चा काढला होता. त्यावेळी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. या झालेल्या राड्यामुळे भाजप- शिवसेनेतील नेेते टीका-प्रतिटीका करत आहेत. मात्र अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

एखाद्या कुटुंबात नवरा बायको भांडतात आणि मग एकत्र चहा पीत बसतात. राजकारणात एखाद्या घटनेवरून विषय समाप्त होत नाही. देशविरोधी बोलणाऱ्यांच्या सुरात तुम्ही का सूर मिसळत आहात, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पुण्यात ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी सामनाच्या अग्रलेखावरूनही शिवसेनेवर निशाणा साधला.

शिवसेना भवनासमोर जे झालं ते क्लेशदायक आहे. एका खुर्चीपायी हे होणं हे क्लेशदायक आहे, असं सांगतानाच तुम्ही रोज सामानातून वाट्टेल ते लिहिणार, जे लिहिता त्याला आधारही नसतो. त्यावर निदर्शने करायची नाही का?, रोषही व्यक्त करायचा नाही का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, ही लोकशाही आहे. त्यामुळे तुमची दंडुकेशाही नाही चालणार. आंदोलकांच्या हातात दगड, गोटे नव्हते. जे काही असेल ते सीसीटीव्हीत येईलच, असं पाटील म्हणाले. त्यासोबत याआधी काँग्रेस आणि शिवसेनेने भाजप कार्यालयासमोर आंदोलन केल्याचं पाटलांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता अशाप्रकारे 4000 रुपये मिळवता येणार; वाचा सविस्तर

“12 सदस्यांची नियुक्ती मार्गी लावून राज्यपालांनी वाढदिवसानिमित्त राज्याला गोड भेट द्यावी”

‘समांतर 2’ वेब सिरीज ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

होय, शिवसेना गुंडगिरी करते आम्ही सर्टिफाईड गुंड, सत्तेचा माज दाखवून राडा झाला असता तर…

राखी सावंतनं सांगितली लस घेण्याची अनोखी पद्धत, म्हणाली….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More