मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आण मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावर पाटलांनी आणखी एक वक्तव्य केलं आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंडेंच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिल्यावर विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या टीका केली आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर माझा विश्वास आहे. ते आता स्वत:हूनच राजीनामा देतील, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हटलं आहे. तर अतुल भातखळकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर आहे आणि त्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची वाट पाहावी लागणार नाही. जे काही निर्णय घ्यावे लागतील, ते आम्हीच तातडीने घेऊ, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“राममंदिरनिर्माणाची तारीख विचारणारे धाराशिव, संभाजीनगरच्या नामांतराची तारीख कधी सांगणार?”
धनंजय मुंडे प्रकरणावर राष्ट्रवादीचीही ‘तीच’ भूमिका-अजित पवार
शेतकऱ्यांना कायदे मान्य नसल्यानं ते परत घेणं सरकारची जबाबदारी- भुपेश बघेल
“धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप राजकीय नसून ते वैयक्तिक”
मला आधी माझा निर्णय घेऊ द्या, नंतर मुख्यमंत्र्यांचं बघू- शरद पवार