Top News पुणे महाराष्ट्र

‘केंद्राने केलेला कृषी कायदा रद्द होणार नाही’; पाटलांचं पवारांना उत्तर

पुणे | कृषी कायद्याविरोधात दिल्लीमध्ये जवळजवळ हजारो शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे.  गेल्या 10 दिवसापासून हे आंदोलन चालू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केंद्राला सल्ला दिला होता. मात्र पवारांच्या या सल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रातूनही सत्ताधारी महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. पण असं असलं तरी कायदा रद्द होणार नाही असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. पुण्यात ते बोलत होते.

प्रश्न फक्त एमएसपीचा होता. केंद्र सरकार ऑन पेपर एमएसपीची रक्कम लिहून द्यायला तयार आहे. तरीही आपण आंदोलन करणार, भारत बंद करणार याला काही अर्थ नाही. केंद्र सरकारने केलेला कायदा रद्द होणार नाही. फक्त कायद्यात बदल केला जाणार असल्याचं पाटील म्हणाले.

दरम्यान, पंजाब आणि हरियाणाचा शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. सरकारची अशीच भूमिका राहिली तर हे आंदोलन दिल्लीपुरतं मर्यादित राहणार नाही.  त्यामुळे मोदी सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, असा सल्ला पवारांनी दिला होता.

महत्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला उर्मिला मातोंडकर यांचा प्रतिसाद; केलं सर्वात श्रेष्ठदान

रक्तदानाच्या बदल्यात चिकन आणि पनीर; शिवसैनिकाच्या ऑफरची सोशल मीडियावर चर्चा

ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याच्या नियमात 14 डिसेंबरपासून मोठा बदल

शहाणपणाची भूमिका घ्या; शरद पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा, म्हणाले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या