बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गोपीचंद पडळकर तळागाळातून आलेले, त्यांनी जे भोगलं ते त्यांनी पोटतिडकीने मांडलं”

मुंबई | भाजप नेते आणि विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलेच चर्चेत आहेत. बुधवारी गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापूरमध्ये त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली. याआधी पडळकरांनी शरद पवारांवर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी पडळकरांवर टीका करण्यास सुरूवात केली. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पडळकरांवर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप नेते गोपीचंद पडळकरांनी काय भोगलंय हे बघा. त्यांनी काय भोगलंय?, कधी गेलंय का कुणी त्यांच्या घरी?, आज ते बऱ्या स्थितीत आहे. ते झोपडीमध्ये राहायचे त्यांनी अनुभवलं की राज्यकर्त्यांनी आम्हाला नाडलं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

ते बोलले मी टोपी फेकली. ती तुमच्या डोक्यावर कशासाठी बसायला पाहिजे?, तुम्ही तसं नाही केलं. तुमची लोकांसाठी काम करायची इमेज असेल तर ठीक आहे. गोपीचंद पडळकर आमचे नेते आहेत तसेच ते आमचे कार्यकर्ते देखील आहेत. त्यांचं जे चुकेल त्यासाठी आम्ही त्यांचे कान पकडूच. पण ते बोलतायत ते पोटतिडकीने भोगत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, तीन खासदार अन साडेतीन जिल्ह्याचा पक्ष असणाऱ्या ‘भावी’ पंतप्रधान शरद पवार यांना पुढील तीस वर्षांच्या ‘भावी’ पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा आहेत, असं गोपीचंद पडळकर म्हणाले होते. त्यासोबतच त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वात दिल्लीत झालेल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीची खिल्ली उडवली होती. त्यानंतर त्यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

“दगडफेक केली त्याला योग्य उत्तर दिले जाईल, ही भाजपसाठी धोक्याची घंटा”

नागरिकांनो सावधान! देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

मोठी बातमी! मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारनं दाखल केलेली पूनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

‘गोपीचंद पडळकर आगे बढो, हम तुम्हारे साथ है’; भाजपच्या ‘या’ महिला आमदाराचा पडळकरांना पाठींबा

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More