बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्ही पूरग्रस्त भागात बोटीत बसून निर्णय करायचो, तुम्हीही डायरेक्ट फिल्डवर उतरा”

अहमदनगर | राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने जोरदार तडाखा लावलेला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी आवाहन केलं आहे.

2019 साली जेव्हा महापूर आला तेव्हा 15 दिवस पाणी ओसरत नव्हतं. मी आणि देवेंद्र फडणवीस डायरेक्ट फिल्डमध्ये होतो. हेलिकॉप्टर, बोटीच्या माध्यमातून आम्ही पोहचलो होतो. अनेक वेळा पाण्यात बसून निर्णय करायचो. त्यावेळी आमच्यावर काँग्रेसकडून टीका केली जात होती. आता तुम्ही सत्तेत आहात. तात्काळ निर्णय घ्या आणि लोकांना मदत करा, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

बोटीत बसूनच निर्णय घेऊन प्रशासनाला कामाला लावायचो. आताही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांनी डायरेक्ट फिल्डवर उतरलं पाहिजे, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील वॉर रूममध्ये बसून वेगवेगळ्या विभागाशी बोलून आढावा घ्यावा, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नेक इमारती पाण्यात गेल्या आहेत. मात्र आमचे मुख्यमंत्री मातोश्रीत बसले आहेत. ते वर्षा निवासस्थानीही नाहीत. मंत्रालयातही नाहीत. मी सकाळी 7 वाजताच मंत्रालयात जाऊन कामाला लागत असल्याचं पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“यांना लाजा वाटत नाही का?, एवढी मोठी दुर्घटना घडली तरी एक अधिकारी घटनास्थळी नाही”

राजकीय व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे प्रसिद्ध ZP शाळा वाबळेवाडीच्या शिक्षकांचे राजीनामे

“संवेदनाहीन, निबर राज्यकर्ते महाराष्ट्राला लाभणं हे राज्याचं दुर्दैव”

‘ती व्यक्ती दुसरी कोणी नसून मी होते’; शर्लिन चोप्राचा खळबळजनक खुलासा

“आपापली मुलंबाळं, जनावरं आणि महत्त्वाच्या वस्तू घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More