बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘महाविकास आघाडी सरकार पडणार नाही’; चंद्रकांत पाटलांंचं आचंबित करणार वक्तव्य

कोल्हापूर |  महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून विरोधी पक्ष भाजपने भाजपने हे सरकार फार काही काळ टिकणार नसून लवकरच पडणार असल्याचं वारंवार म्हटलं होतं. मात्र महाविकास आघाडी सरकार अद्यापही सत्तेत आहे. भाजपचे नेते वारंवार सत्ता पडणार असल्याची वक्तव्य करत असतात मात्र अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकार पडणार नसल्याचं वक्तव्य केलं आहे.

सत्तेत असलेले सगळे जण अतिशय हुशार आहेत. त्यांना सत्तेची ताकद माहिती आहे. आपलं सरकार अपघातानं याची त्यांना कल्पना आहे. सरकार आल्यापासून आपण खूप बदल्या करू शकलो. कार्यकर्त्यांना खूष करू शकलो याची सत्तेत असलेल्या पक्षांच्या नेत्यांना कल्पना आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

वर्षानुवर्षे सत्तेत राहिल्यानं सरकारमधील पक्षांना सत्तेची ताकद काय असते याची कल्पना आहे. त्यामुळे ते खूप भांडतील पण सरकार पडू देणार नसल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. कोल्हापूरमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान, विरोधकांनी कितीही एकमेकांच्या भेटीगाठी घेऊ द्या, ते कोणाच्याही नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवू द्या. तरीही आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप चारशेपेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वासही चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला.

 

 

 

 

 

 

थोडक्यात बातम्या-

“वेगळेच लढणार असाल तर आधीच सांगा, आम्हालाही तयारीला लागता येईल”

राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याबाबत शरद पवारांनी सोडलं मौन; म्हणाले…

मिर्झा गालिब यांच्या नावानं चुकीची शायरी शेअर केल्यानं अमिताभ बच्चन झाले ट्रोल!

‘शरद पवार राष्ट्रपती होणार असतील तर….’; नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य

कोरोना निर्बंध पुन्हा लागू करण्याच्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राज्यांना सूचना

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More