मुंबई | राज्यात कोरोनाची गंभीर स्थिती असताना न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर मराठा आरक्षणावरून टीका केली आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा खून केला आहे. या आरक्षणाचा मुडदा पाडला आहे. हे आरक्षण मातीमोल केलं. महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यात कुठे कमी पडले, याची पोलखोल करण्यासाठी आम्ही लवकरच कायदेतज्ज्ञांची समिती स्थापन करणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. घटनात्मक कार्यवाही करून हे आरक्षण देण्यात आले होते. हायकोर्टातही हे आरक्षण टिकवले होते आणि सर्वोच्च न्यायालयात या आरक्षणाला वर्षभर स्थगिती मिळवू दिली नाही. पण आघाडी सरकारने सत्तेत येताच या आरक्षणाचा खून केला आणि मुडदा पाडला, असं पाटील म्हणाले.
दरम्यान, मराठा आरक्षणावर अभ्यास करण्यासाठी भाजपाने एक समिती स्थापन केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, विनायक मेटे, नरेंद्र पाटील आणि श्रीकांत भारतीय यांचा समावेश असल्याची माहिती पाटलांनी दली.
थोडक्यात बातम्या-
‘डोळ्यांदेखत रुग्ण जीव सोडताहेत अन् आम्ही हतबलपणे पाहतोय’; डॉक्टर ढसाढसा रडले, पाहा व्हिडीओ
…अन्यथा तुमच्यावर कारवाई करणार; सलमान खानची कायदेशीर कारवाईची धमकी
गोड बोलून त्याला जवळ बोलावलं अन् नंतर महिलेनं त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला; धक्कादायक कारण आलं समोर
पुण्यात रंगला मुळशी पॅटर्नचा थरार! भरदिवसा रस्त्यात तरूणावर सपासप वार करत केला खून, पाहा व्हिडीओ
खळबळजनक! घरी क्वारंटाईन असलेल्या कोरोनाग्रस्त महिलेवर पाच जणांकडून गँगरेप
Comments are closed.