बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मनसेसोबत युतीसाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागणार”

पुणे | गेल्या अनेक दिवसांपासून येेत्या महापालिका निवडणुकीमध्ये मनसे-भाजप एकत्र येणार असल्याचं बोललं जात होतं. अशातच यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देताना भाजप-मनसे युतीला हिरवा कंदिल दिला आहे पण त्यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागणार असल्याचं म्हटलं आहे. पुण्यामध्ये ते बोलत होते.

मनसेचा परप्रांतीयांना असणारा विरोध ही युतीमधील अडचण आहे. जर ही अडचण दूर झाली तर मी युतीसाठी ओके देईल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ही युती फक्त महापालिका निवडणुकांसाठी नाहीतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्येही राहणार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे हे माझे आवडतं व्यक्तिमत्त्व आहेत. मनसोबत युती होऊ शकते पण त्याबाबत मी एकदा निर्णय घेऊ शकत नाही. युती ऑन दी स्पॉट होणार नाही त्यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागणार आहे. राज ठाकरेंना मी एक ते दोन दिवसात भेटणार आहे. या भेटीत मी माझ्या मनातील सर्व प्रश्न मांडणार असल्याचं पाटील म्हणाले.

दरम्यान, पाटील यांनी बोलताना, राज ठाकरेंनी मला क्लिप पाठवली असून ती मी ऐकली असल्याचं सांगितलं. नेमकं क्लिपमध्ये काय आहे?, त्यासोबतच त्यांच्या भेटीत कशावर चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘ना सरकारी नोकरी, ना पासपोर्ट’; दगडफेक करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सरकारने उचललं मोठं पाऊल

कोरोनाची तिसरी लाट कधी येणार?; विजय वडेट्टीवारांनी दिली महत्वाची माहिती

धक्कादायक! ऑनलाईन क्लास सुरू असताना मध्येच सुरू झाला पॉर्न व्हिडीओ अन्…

मला खोटं बोलता येत नाही, जे करायचंय ते केल्याशिवाय राहणार नाही- उद्धव ठाकरे

‘मंडपात एंट्री घेताच नवरीने केलं असं काही की…’; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More