Top News महाराष्ट्र मुंबई

‘पोलिसांनी पूजा चव्हाणची ती गोष्ट तपासावी, बऱ्याच गोष्टी बाहेर येतील’; भाजपच्या नेत्याच्या गौप्यस्फोट

मुंबई | बीडमधील असलेल्या परळी वैजनाथच्या पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यातील महंमदवाडीमध्ये एका सोसायटीतील पहिल्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणाने सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. कारण आत्महत्येशी राज्य सरकारमधील एका मंत्र्याचं नाव जोडलं गेलं आहे.

भाजपकडून थेट शिवसेनेच्या मंत्र्यावर टीका करण्यात आली आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर पूजाच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजप नेत्या आणि महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संजय राठोडांचं जाहीरपणे नाव घेत त्यांच्यावर आरोप केला आहे. या प्रकरणातील काही ऑडिओ क्लिप्स सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्या आहेत त्यामुळे विरोधी पक्षानेही हे प्रकरण लावून धरलं आहे.

आतापर्यंत या प्रकरणातील ज्या ऑडिओ क्लीप्स समोर आल्या आहेत त्याआधारे पोलिसांनी चौकशी करावी. पोलिसांनी अजूनही पूजा चव्हाणचा लॅपटॉप चेक केलेला नाही. त्याची तपासणी केल्यास बरीच माहिती समोर येईल असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या प्रकरणात लक्ष घालावं आणि पूजा चव्हाणला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, जर या आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी योग्य भुमिका घेतली नाही आणि दोषींवर गुन्हा दाखल झाला नाही, तर जनतेचा राज्य सरकारवरचा विश्वास उडेल, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

…ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसाठी लाजिरवाणी गोष्ट- चंद्रकांत पाटील

पुन्हा लॉकडाऊनबाबत राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी तृप्ती देसाई आक्रमक, सरकारवर केला ‘हा’ गंभीर आरोप

“होळकरांच्या सामाजिक कार्याचा उपयोग करून राजकीय स्वार्थ साधण्याचा शरद पवारांचा प्रयत्न”

“पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या