बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सरकारने संजय राठोडांचा राजीनामा घेतला नाही तर…’; चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून विरोधी पक्षाने जोरदार टीका करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. या प्रकरणात शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड यांचं नाव समोर येत आहे. त्यासोबतच सोशल माध्यमांवर काही ऑडिओही व्हायरल झाले होते. याच पार्श्वभमीवर भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणावरून सरकारला इशारा दिला आहे.

राज्य सरकारने संजय राठोडांवर काही कारवाई केली नाही आणि अधिवेशनात या मुद्द्यावर तोंड न उघडणाऱ्या राज्य सरकारला अधिवेशनात तोंड उघडू देणार नाही, सभागृह चालू देणार नाही, असा इशाराही चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे सरकार संजय राठोडांवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सोमवारपासून राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होत आहे. सोमवारच्या आत राज्य सरकारने मंत्री संजय राठोडांचा राजीनामा घेतला नाही, त्यांची चौकशी सुरू केली नाही आणि मुख्यमंत्र्यांनी यावर अधिवेशनात पहिल्याच दिवशी निवेदन करावं, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे हे सत्यवादी आहेत हे मान्य आहे. प्रबोधनकार ठाकरेंचे ते नातू आहेत. पण व्यवहारात ते दिसत नाही. भूमिका घेताना त्यांना स्वत:च्या खुर्चीची काळजी आहे. त्यामुळे संजय राऊतांना ते सत्यवादी कुठे दिसले, ते माहीत नाही, असं म्हणत पाटलांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

थोडक्यात बातम्या-

जब्याच्या शालूचा सोशल मीडियावर जलवा; रोज शेअर करतेय नवा फोटो, पाहुण घ्या

चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर केलेल्या त्या आरोपांना चाकणकरांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या….

तुम्ही मास्क घातलं नाही?; पत्रकाराच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं धक्कादायक उत्तर

“मी भ्रष्ट नाही त्यामुळे भाजपवाले माझ्यावर 24 तास टीका करतात”

हरिश्चंद्रानं उद्धव ठाकरेंच्या रुपात पुनर्जन्म घेतला पण…- अतुल भातखळकर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More