Top News महाराष्ट्र मुंबई

“मंत्र्यांचे तरूणीसोबत फोटो प्रसिद्ध होऊनही कारवाई नाही, उद्धव ठाकरे शरद पवार गप्प का”

Photo Courtesy- Facebook/Sharad Pawar % Sanjay Rathod

मुंबई |  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर शिवसेना नेते संजय राठोडांनी वाशिम जिल्ह्यात पोहरदेवी येथे पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली. तब्बल 15 दिवसांनी संजय राठोड या प्रकरणावर बोलण्यासाठी समोर आले. गेल्या 14 दिवसांपासून राठोड यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती की माध्यमांसमोर आले नव्हते. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी टीका केली आहे.

तरुणीच्या आत्महत्येचा आरोप असेलेले आणि लपून बसेलले राज्य सरकारमधील एक मंत्री आज 15 दिवसानंतर वाजतगाजत प्रकट झाले, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला. यावेळी टीका करताना चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला.

सत्तेचा गैरवापर करून कायदा खिशात घालण्याची परिसीमा ठाकरे सरकारने ओलांडली आहे. या सर्व घडामोडी महाराष्ट्राच्या जनतेसमोर सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार गप्प का आहेत?, असा सवाल पाटलांनी केला आहे. त्यालोबतच त्या मंत्र्यांच्या विरोधात एवढे पुरावे समोर येऊनही अजून काय सिद्ध होणं बाकी आहे? राज्य सरकार अजूनही ढिम्मपणे बघ्याची भूमिका का घेत आहे? राज्य सरकार त्या प्रकरणावर कोणताही गुन्हा नोंदवून घेण्यास का तयार नाही आहे, असंही पाटील म्हणाले.

दरम्यान, जोपर्यंत त्या तरुणीच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणीही पाटलांनी यावेळी केली आहे. मात्र सकाळी पत्रकार परिषद घेत संजय राठोड यांनी सर्व फेटाळून लावले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“वाॅर्नरला हैदराबादच्या कर्णधारपदावरुन हटवा, त्याचा फिक्सिंगमध्ये सहभाग”

“कॉलर उडवणारे आणि मिशी पिळणारे घरात बसले आहेत”

जालना जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय ‘या’ तारखेपर्यंत बंद पण…

अडवाणी, अजित पवारांनी जी परंपरा पाळली ‘ती’ संजय राठोडांनीही पाळावी- सुधीर मुनगंटीवार

धक्कादायक! भाजप पदाधिकाऱ्यासह चौघांनी केला वीस वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या