बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अवताडेंचा विजय आघाडी सरकारच्या थोबाडीत मारल्यासारखा, फडणवीस जे बोलतात ते करुन दाखवतात”

पुणे | मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून होतं. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे. समाधान आवताडे यांनी शेवटच्या फेरीत 3 हजार 733 मतांनी भालके यांचा पराभव केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

समाधान अवताडे यांचा विजय हा महाविकास आघाडीला थोबाडीत मारल्यासारखा असल्यासारखा असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तर यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. पुण्यात ते टीव्ही 9 शी बोलत होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते करून दाखवतात. यापुढच्या निवडणुकीतसुद्धा आम्ही संघटनात्मक पद्धतीने काम करणार असणार असल्याचं पाटील म्हणाले. तर पाच राज्यांच्या निकालामुळे काँग्रेस पक्ष शून्य आणि अस्तित्वहीन झाला असल्याचं म्हणत पाटील यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजपाला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. येथे भाजपाला रोखण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले होते. बंगालमध्ये एकेकाळी निर्विवाद सत्ता राखणारे डावे आणि जास्त जागा जिंकणाऱ्या काँग्रेसचे संख्याबळ मर्यादित राहिलेले दिसते. बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्यांनी तृणमूल काँग्रेससोबत अघोषित आघाडी केली. अघोषित आघाडीमुळे काँग्रेस आणि डाव्यांनी आपली मते तृणमूलच्या पारड्यात टाकली, त्यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्याचा दावा पाटलांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

कसा झाला समाधान आवताडे यांचा विजय?, पाहा 38 फेऱ्यांमध्ये कशी कशी मिळाली मतं

“संज्या, तू स्वत: कधी निवडून येणार ते आधी सांग”

“तुम्ही फक्त जामिनावर सुटलात, जोरात बोलू नका नाहीतर महागात पडेल”

समाधान अवताडेंचा विजय निश्चित होताच देवेंद्र फडणवीसांचा ‘हा’ व्हिडीओ तुफान व्हायरल!

मोठी बातमी! पंढरपुरात महाविकास आघाडीचा धुव्वा, भाजपचे समाधान आवताडे विजयी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More