Top News महाराष्ट्र मुंबई

“कोण रश्मी वहिनी? असं बहुतेक संजय राऊतांचं म्हणणं असावं”

मुंबई | शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आपल्या लेखनातून विरोधकांवर टीका करत असतात. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लेखनाची भाषा ही वृत्तपत्रातील लिखाणाच्या शिष्टाचाराला अनुसरून नसल्याचं म्हटलं होतं. या मुद्यावरून पाटलांनी सामनाच्या संपादक रश्मी ठाकरेंना पत्र लिहित राऊतांवर निशाणा साधला आहे.

आमच्यावर काय टीका केली आहे हे पाहण्यासाठी आम्ही सामना नेहमीच वाचतो. मी रश्मी वहिनींना पत्र लिहिणार हे समजल्यावर त्याला तक्रारीचं रूप संजय राऊतांनी दिलं आणि माझ्यावर पुन्हा नव्याने टीका केली. राऊत आता मला घाबरतायत असं ते म्हणाले.

यातून हेच स्पष्ट दिसून येतं की ते बहुदा रश्मी ठाकरे यांना फारसे घाबरत नाहीत. त्यांच्या अशा वक्तव्यानंतर, ‘कोण रश्मी वहिनी ठाकरे?’ असं बहुतेक संजय राऊतांचं म्हणणं असावं असं दिसतंय, असंं म्हणत पाटलांनी राऊतांना टोला लगावला.

दरम्यान, चंद्रकांत पाटलांनी रश्मी ठाकरेंना पत्र लिहिलं आहे आणि त्या पत्राचा फोटो घेत फेसबुक पोस्ट केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“आता सत्ता महत्त्वाची की मराठी अस्मिता महत्त्वाची हे शिवसेनेने ठरवावं”

‘सरकार तीन पक्षांचं आहे शिवसेनेने विसरून नाही चालणार’; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा शिवसेनेला इशारा

“छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज केवळ हिंदूंचे राजे नव्हते ते अठरापगड जातींचे राजे होते”

रोहित शर्माची एक चूक आणि भारताचे 5 खेळाडू आयसोलेशनमध्ये

“औरंगाबादचे नामांतर महाविकासआघाडी सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोगामचा भाग नाही, आमचा कायम विरोधच”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या