बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊत यांना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री करा- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर | सचिन वाझे यांना मनसुख हिरेन प्रकरणात अटक करण्यात आली असून त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. यावरून विरोधी पक्ष भाजपने आक्रमक भूमिका घेतली असूून शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊतांना टोला लगावत मुख्यमंंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

उद्धवजींनी आता अतिशय धाडसी, कोणाचीही काळजी न करता स्टेटमेंट करणाऱ्या, कोण आहे या समोर अस म्हणणाऱ्या संजय राऊतांना महाराष्ट्राचे गृहमंत्री केलं पाहिजे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच शिवसेना नेते संजय राऊत यांना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री करा, त्यांच्याशिवाय मंत्रिमंडळामधील कुणीच मंत्री बोलत नाहीत, असंही पाटील म्हणाले. कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सचिन वाझे प्रकरणावरही भाष्य केलं आहे.

दोन तपास यंत्रणांकडून तपास सुरु आहे. शोध लागला आहे, आता बुरखे फाटायला वेळ लागणार नाही. कोण कोण पायाखाली येतंय हे रात्रीपर्यंत बाहेर येईल, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांनीही सरकारवर या प्रकरणावरून टीका केली आहे.

दरम्यान, माझ्या मते सचिन वाझे यांचा पूर्वोतिहास पाहता पोलीस खात्यात परत घेणं तसेच मनसुख हिरेन आणि अन्य हत्या. या सर्वांना जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी नारायण राणेंनी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

मुंबईचे नवे आयुक्त हेमंत नगराळे कोण आहेत?; आतापर्यंत केलीय ‘ही’ जबरदस्त कामगिरी

‘पुरावा असेल तर…’; संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान

पोलिसांची मोठी कारवाई; ‘या’ प्रसिद्ध मराठी न्यूज चॅनेलच्या 2 संचालकांना अटक

पुणे शहरातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी 2 हजार पार!

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा- नारायण राणे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More