Top News महाराष्ट्र मुंबई

“50 वर्षांत शरद पवारांनी मराठा आरक्षण का दिलं नाही?, आरक्षण देण्याची तुमची इच्छा कधीच नव्हती”

मुंबई | मराठा आंदोलनाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. 50 वर्षांपासून राजकारणात असताना मराठा आरक्षण का दिलं नाही?, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या स्थगितीच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी अध्यादेश काढण्याचा पर्याय सुचवला होता. यावर शरद पवांरांकडून अशी अपेक्षा नाही. सलग 15 वर्ष तुमची राज्यात सत्ता होती. ते 50 वर्षांपासून राजकारणात असताना मराठा आरक्षण का दिलं नाही, असा सवाल पाटील यांनी केला आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याची तुमची इच्छा कधीच नव्हती. जर होती तर तुम्ही आधीच ते द्यायला हवं होतं आणि आता भाजपने दिलेल्या आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर तुम्ही अध्यादेश काढायला निघालात म्हणजेच हे मराठा समजाच्या तोंडाला पाण पुसल्यासारखं आहे, अशी टीकाही पाटील यांनी पवारांवर केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात केंद्र सरकारची काहीच भूमिका नव्हती. कारण केंद्र सरकार हा काही पक्ष नाही. हे आरक्षण टिकलं असतं पण राज्य सरकराने काय पूर्वतयारी केली?, कारण वकिलांमध्ये समन्वय नसल्याचं पाटलांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘बॉलिवूडशी नातं सांगणारे वांद्रे पूर्वेला राहतात’; शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला

“मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अनाकलनीय

व्यंगचित्रावरुन आता शिरुरमध्येही राजकारण तापलं; शिवसेना-राष्ट्रवादीत स्टेटस वॉर सुरु!

“देवासारख्या नेतृत्वावर कोण टीका करत असेल तर सहन करणार नाही”

नागपूरात आता मास्क न वापरल्यास भरावा लागणार इतका दंड!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या